Shree Swami Samarth Nam:

|| श्री स्वामी समर्थ ||


|| स्वामींचा कमंडलु मंत्र ||श्री गणेशाय नमः श्री दत्तात्रेयाय नमः
श्री स्वामी समर्थाय नमः

स्वामीध्यानं
साऱ्या विश्वाचा एकच निर्गुण साक्षीभूत आधार।
असुनी ते दिगंबर स्वामी पूर्णची दत्तावतार।।

शोभतो सोन्याचा कमंडलु तयाच्या करात।
सोडवी गुंतागुंतीची माया बांधलेली या घरात।।

कमंडलु आहे तो जलाने भरलेला ओत प्रोत।
सज आहे तो दुष्ट बाधेस करावया फस्त।।

भूत प्रेतादि योनि सदा राहतात उन्मत्त।
स्मरता स्वामींचा कमंडलु पलायन तेचि करतात।।

पठण करूनी स्वामींचे कवच,नीर प्राक्षावे देहावरी।
सारूनी मायची कात,ज्ञानप्रभा सांडावी विश्‍्वावरी ।।

दारिद्र द'ख लाभ मोह इर्षा द्वेष हे सारेच मायाविश्वात।
धावण करण्या हेतुने अमृत भरले कमंडलुत।।

ग्रह पीडा व रोगाने मन राही सदा विषण्ण
तयातील अमृत प्रोक्षिल्याने सारे होईल छिन्न विछिन्न!।

रोगपीडेने काया होते जीर्ण व त्रस्त।
झांडता कमंडलु नीर, निवारण होईल समस्त ।।

ऋण चिंतेने व्याकुळला जीवार्से मिळे आराम
प्रशता कमंडलु नीर तयाचा होईल पूर्णविराम ।।

लाभुनी सुख समाधान सर्व समृद्धी मांडेल ठाण ।
देखता क्षणीच कमंडलुस अघोरी विद्या करती प्रयाण ।

सूर्य व चंद्र ग्रहे संक्रांती काले उदक होई सिद्ध!
पचम वार पठुनी तारकमंत्र दुष्ट होतील बद्ध।।

समस्ता जादू टोणादी विकार आहत मन ल॑पट।
प्रोक्षता कमंडलु नीर, दूर करेल ते सावट ।।

असा हा कमंडलु स्वामींचा, राहे सर्व सिद्ध।
जाऊनी तिमिर दुरितांचे गुरुसेवेत करी बद्ध!

श्री स्वामी समर्थाऽर्पणमस्तु।
शुभं भवतु। शुभं भवतु।। शुभं भवतु।।
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||


एका पेल्यात पाणी भरून तो पेला
स्वामींच्या फोटो समोर ठेवणे व हे कमंडलु स्तोत्र
रोज ५ वेळा वाचून नंतर ते कमंडलुतील पाणी प्राशन करावे

Download pdf
Back